सेमीकंडक्टर
३. वाहक दुर्वाहक व अर्धवाहकाचा उर्जा संच कसा असतो ?
कंडक्टर : ज्या मटेरियलमध्ये व्हॅलेन्स आणि कंडक्शन बँड एकमेकांत मिसळलेले (ओव्हरलॅप केलेले) असतात त्यांना कंडक्टर म्हणतात. त्यात निषिद्ध ऊर्जा अंतर(Forbidden energy gap) नसते.
इन्सुलेटर: ज्या मटेरियलमध्ये पूर्ण भरलेले व्हॅलेन्स बँड आणि पूर्ण रिकामा वहन बँड असतो त्यांना इन्सुलेटर म्हणतात. त्यात मोठ्या प्रमाणात निषिद्ध ऊर्जा अंतर असते.
सेमीकंडक्टर: ज्या पदार्थामध्ये सामान्य तपमानाला जवळजवळ पूर्ण व्हॅलेन्स बँड आणि अंशतः रिकामा वहन बँड असतो त्याला सेमीकंडक्टर म्हणतात. त्यात लहान निषिद्ध ऊर्जा अंतर आहे.
No comments:
Post a Comment