2.33

३३. इण्डक्टर-कपॅसिटर  (LC ) फिल्टरची मंडलाकृती काढून कार्य स्पष्ट करा.   

 

LC फिल्टर मंडलाकृती व आलेख :


येथे इण्डक्टर लोड च्या एकसर (सेरीज) मध्ये व  कॅपेसिटर लोड RLच्या समांतर जोडला आहे , 




       



कार्य: 

रेक्टिफायरच्या आउटपुटमध्ये ac ​​तसेच dc घटक असतात. आपल्याला माहित आहे की इंडक्टर डीसी पास करतो परंतु एसी करंटला अवरोधित करतो. इण्डक्टर लोड च्या एकसर मध्ये जोडलेला आहे त्यामुळे ac करंटला लोड मध्ये पाठविला जात नाही .  इंडक्टर एसी करंटचा रस्ता ब्लॉक करतो आणि फक्त डीसी करंट इंडक्टर आणि लोड रेझिस्टन्स RL मधून प्रवाहित होतो . इंडक्टरचा डीसी रेझिस्टन्स खूप कमी आहे म्हणून त्याचे डीसी व्होल्टेज ड्रॉप जवळजवळ शून्य होते , व dc व्होल्टेज लोड RLमध्ये उपलब्ध होते. यानंतरही जर आउटपुटमध्ये अजूनही ac घटक असल्यास, ते कपॅसिटर मार्फत ग्राऊंड कडे पाठविले जाते(कारण आपल्याला माहित आहे की कॅपेसिटर ac पास करतो परंतु dc करंटला अवरोधित करतो.) लोड RLमध्ये आपणास जास्त शुद्ध DC व्होल्टेज मिळते. 

येथे इंडक्टर आणि कॅपेसिटरच्या एकत्रितपणा मुळे AC व्होल्टेज (रिपल )  मोठ्या प्रमाणात कमी होते.

 

No comments:

Post a Comment