३२. इण्डक्टर (L ) फिल्टरची मंडलाकृती काढून कार्य स्पष्ट करा.
सर्किट डायग्राम: येथे इंडक्टर लोड रेझिस्टन्स RL च्या सेरीक मध्ये जोडला आहे.
कार्य:
रेक्टिफायरच्या आउटपुटमध्ये ac तसेच dc घटक असतात. आपल्याला माहित आहे की इंडक्टर डीसी पास करतो( पुढे पाठवितो ) परंतु एसी करंटला विरोध करतो.येथे इण्डक्टर लोड च्या एकसर जोडणीत जोडलेला आहे त्यामुळे इंडक्टर लोड मध्ये एसी करंटला जाण्यास प्रतिबंध करतो आणि फक्त डीसी करंट इंडक्टर मधून सहजपणे विना अटकाव लोड रेझिस्टन्स RL मध्ये प्रवाहित होतो. इंडक्टरचा डीसी रेझिस्टन्स खूप कमी आहे म्हणून त्याचा डीसी व्होल्टेज ड्रॉप जवळजवळ शून्य आहे, व लोड RL मध्ये संपूर्ण शुद्ध DC व्होल्टेज उपलब्ध होते.अशा प्रकारे आपण ac घटक(रिपल ) काढून टाकतो आणि शुद्ध DC व्होल्टेज मिळवतो.
No comments:
Post a Comment