2.31

 ३१. कॅपेसिटर (C) फिल्टरची मंडलाकृती काढून कार्य स्पष्ट करा.   


कॅपेसिटर फिल्टर: 


सर्किट डायग्राम: येथे कॅपेसिटर रेक्टिफायरचे  आउटपुट आणि लोड रेझिस्टन्स RL यांचे समांतर जोडला आहे. 
















कार्य: 

पहिल्या 0-90अंश मध्ये  धन  हाफ सायकलच्या सर्वोच्च मूल्यापर्यंत कपॅसिटर प्रभारित (चार्ज) होतो. जेव्हा पॉझिटिव्ह हाफ सायकलचे  व्होल्टेज कमी होऊ लागते  ( 90-180 अंश), कॅपेसिटर चार्ज तसाच ठेवतो कारण तो रेक्टिफायर डायोडद्वारे डिस्चार्ज होऊ शकत नाही. पर्यायाने , कॅपेसिटर C त्याच्या समांतर असणाऱ्या लोड रेझिस्टन्स RL.मार्फत डिस्चार्ज होऊ लागतो. डिस्चार्ज कालावधी लोड  RL.व कपॅसिटर C यांचे किमतीच्या गुणाकारावर अवलंबून असतो. या दोन्ही किमती मोठ्या असलेने , कपॅसिटर अल्प प्रमाणात डिस्चार्ज होतो आणि तोपर्यंत आउटपुट व्होटेजची पुढची धन हाफ सायकल सुरु होते व ती कपॅसिटर ला पुन्हा सर्वोच्च मूल्यापर्यंत प्रभारित (चार्ज) करते. हि क्रिया सातत्याने चालू राहते. यामुळे आउटपुट व्होल्टेज मध्ये होणारा बदल/ चढउतार ( रिपल ) कमी होतो. वरील आलेखात हे दर्शविले आहे.   

याचाच अर्थ आउटपुट व्होल्टेज मधील ac चे प्रमाण कमी होते व dc चे वाढते म्हणजे आपणास जास्त शुद्ध dc व्होल्टेज मिळते.  

पर्यायी स्पष्टीकरण :  रेक्टिफायरच्या आउटपुटमध्ये ac ​​तसेच dc घटक असतात. आपल्याला माहित आहे की कॅपेसिटर एसी पास करतो(पुढे पाठवितो)  परंतु डीसी करंटला विरोध करतो. येथे कॅपेसिटर रेक्टिफायरच्या आउटपुट आणि लोड RLच्या समांतर जोडला आहे. त्यामुळे कॅपेसिटर ac घटकांना लोड कडे जाऊ न देता ग्राउंडकडे बायपास करतो आणि लोड रेझिस्टन्स RL मध्ये केवळ  DC व्होल्टेज उपलब्ध होते. अशा प्रकारे आपण ac घटक(रिपल)  काढून टाकतो आणि शुद्ध DC व्होल्टेज मिळवतो.

















No comments:

Post a Comment