२९. पी एन जंक्शन डायोड च्या संदर्भातील खालील संज्ञा स्पष्ट करा.
१)रिपल व्होल्टेज आणि रिपल फॅक्टर
२)रेक्टिफायरची कार्यक्षमता
३) डायोडचे पीक युनिव्हर्स व्होल्टेज (पीआयव्ही) डायोड
रिपल व्होल्टेज आणि रिपल फॅक्टर:
रेक्टिफायरचे आउटपुट शुद्ध डीसी व्होल्टेज नाही. हे DC pulsating आहे याचा अर्थ आउटपुटमध्ये DC तसेच AC व्होल्टेज मिश्रित आहे. हे मिश्रित एसी व्होल्टेज म्हणजेच रिपल व्होल्टेज होय . चांगल्या डी सी वीज पुरवठ्यासाठी हे रिपल व्होल्टेज कमीट कमी असावे लागते .
रेक्टिफायरच्या आउटपुटमध्ये असलेल्या एसी व्होल्टेजच्या आरएमएस व्हॅल्यू आणि डीसी व्होल्टेजच्या मूल्याच्या गुणोत्तराला रिपल फॅक्टर म्हणतात.
हाफ वेव्ह रेक्टिफायरसाठी रिपल फॅक्टर 1.21 आहे आणि फुल वेव्ह रेक्टिफायरसाठी 0.48 आहे.
रेक्टिफायरची कार्यक्षमता:
रेक्टिफायरची आउटपुट पॉवर आणि रेक्टिफायरची इनपुट पॉवरच्या गुणोत्तराला रेक्टिफायरची कार्यक्षमता म्हणतात. हाफ वेव्ह रेक्टिफायरची कार्यक्षमता 40.6% आणि फुल वेव्ह रेक्टिफायरची कार्यक्षमता 81.2% आहे.
डायोडचे पीक युनिव्हर्स व्होल्टेज (पीआयव्ही) डायोड
डायोडचे नुकसान न होता (without damaging) डायोड जे कमाल व्होल्टेज हाताळू हाताळू शकतो त्यास डायोडचे पीआयव्ही म्हणतात.
हाफ वेव्ह रेक्टिफायर आणि फुल वेव्ह ब्रिज रेक्टिफायरमध्ये वापरल्या जाणार्या डायोडसाठी आवश्यक असलेले पीआयव्ही, ट्रान्सफॉर्मरच्या सेकंडरीच्या कमाल किंवा पीक व्होल्टेजच्या बरोबरीचे असते.
फुल वेव्ह सेंटर टेपेड रेक्टिफायरमध्ये वापरल्या जाणार्या डायोडसाठी आवश्यक असलेले PIV हे ट्रान्सफॉर्मरच्या सेकंडरी च्या कमाल किंवा पीक व्होल्टेजच्या दुप्पट असते.
No comments:
Post a Comment