2.28

 २८. फुल वेव्ह ब्रिज रेक्टीफायर ची मंडलाकृती काढून कार्य स्पष्ट करा.


 

 

 

 

कार्य - एसी व्होल्टेजच्या धन हाफ सायकल दरम्यान, सेकंडरी  टर्मिनल S1 ,S2  टर्मिनलच्या तुलनेत धन पोटेंशिअलवर आहे. टर्मिनल S2 ऋण  पोटेंशिअलवर आहे. त्यामुळे डायोड D1 आणि D3 फॉरवर्ड बायस्ड होतील . डायोड D2 आणि D4 रिव्हर्स बायस्ड होतील. या मुळे प्रवाहाची दिशा S1-D1-RL-D3-S2 अशी राहील . यामुळे लोड R Lवर धन हाफ सायकल मुळे व्होल्टेज ड्रॉप तयार होतो.

एसीच्या ऋण हाफ सायकल दरम्यान, सेकंडरीचे टर्मिनल S2 , S1 च्या तुलनेत धन  पोटेंशिअलवर आहे.  S1  ऋण  पोटेंशिअलवर आहे.  त्यामुळे डायोड D2 आणि D4 फॉरवर्ड बायस्ड असतील . डायोड D1 आणि D3 रिव्हर्स बायस्ड राहतील यामुळे करंट ची दिशा S2-D2-RL-D4-S1 अशी राहील  यामुळे लोड RLवर ऋण हाफ सायकल मुळे व्होल्टेज ड्रॉप तयार होतो. दोन्ही हाफ सायकल दरम्यान लोड RL मधून वाहणाऱ्या करंट ची दिशा एकच राहते म्हणजेच उपलब्ध व्होल्टेज हे डी सी होय.  





इनपुट व आउटपुट व्होल्टेज चे आलेख वरील आकृतीत दाखविले आहेत.  


No comments:

Post a Comment