2.27

 २७. फुल वेव्ह सेंटर टॅप्ड़ रेक्टीफायर ची मंडलाकृती काढून कार्य स्पष्ट करा. 











फुल वेव्ह रेक्टिफायरला रेक्टिफायरचा एक प्रकार म्हणून परिभाषित केले जाते जे अल्टरनेटिंग वेव्ह (AC सिग्नल) च्या प्रत्येक सायकलच्या दोन्ही अर्ध्या सायकल ना  DC सिग्नलमध्ये रूपांतरित करते.

 फुल-वेव्ह रेक्टिफायर्सचा वापर AC व्होल्टेजला DC व्होल्टेजमध्ये रूपांतरित करण्यासाठी केला जातो.

या मध्ये खालील घटकांचा समावेश असतो .. 

१. Centre-tapped ट्रान्सफॉर्मर 

२. दोन डायोड्स 

३. लोड रेसिस्टन्स 

कार्य :  सेंटर टेप केलेले ट्रान्सफॉर्मर वापरून पूर्ण वेव्ह रेक्टिफायरची चर्चा करू. जेव्हा इनपुट एसी पुरवठा चालू केला जातो, तेव्हा ट्रान्सफॉर्मर सेकंडरीचे  S1 आणि S2 आळीपाळीने धन  आणि ऋण  होतात. 

एसी व्होल्टेजच्या पॉझिटिव्ह हाफ सायकलचे वेळी , समजा टर्मिनल S1 पॉझिटिव्ह पोटेन्शियलवर आहे तर टर्मिनल S2 हे टर्मिनल C च्या तुलनेत  ऋण पोटेन्शियलवर  आहे. म्हणून डायोड D1 फॉरवर्ड बायस्ड होतो व त्यामधून करंट वाहतो., पण डायोड D2 रिव्हर्स बायस्ड झाल्याने त्या मधून करंट वाहत नाही.  परिणामी करंट S1 - D1- A- RL या दिशेने वाहतो व एसी व्होल्टेजचे धन  हाफ सायकल  लोड RL .मध्ये उपलब्ध होते.  

एसी व्होल्टेजच्या ऋण हाफ सायकल दरम्यान, टर्मिनल S2 हे धन  पोटेन्शियलवर असते तर टर्मिनल S1 हे टर्मिनल C च्या तुलनेत  ऋण पोटेन्शियलवर असते. त्यामुळे रिव्हर्स बायस्ड डायोड D1 मधून करंट वाहत  नाही, तर फॉरवर्ड बायस्ड डायोड D2   च्या मार्गाने  विद्युत प्रवाह वाहतो म्हणून करंट ची दिशा S2.-- D2 –A- RL – C. अशी राहते. येथे ऋण हाफ  सायकल पूर्वीच्याच दिशेने लोड RL मध्ये उपलब्ध होते.   

येथे इनपुट ac व्होल्टेजच्या च्या दोन्ही अर्ध्या सायकलला   विद्युतप्रवाह लोड  

RL मधून एकाच दिशेने वाहतो.म्हणजेच उपलब्ध आउटपुट व्होल्टेज हे डी सी व्होल्टेज आहे .  













No comments:

Post a Comment