२६. हाप वेव्ह रेक्टीफायर ची मंडलाकृती काढून कार्य स्पष्ट करा
हाफ वेव्ह रेक्टिफायर एक डायोड सर्किट आहे ज्याचा वापर अल्टरनेटिंग व्होल्टेज (एसी सप्लाय) चे रूपांतरण डायरेक्ट व्होल्टेजमध्ये (डीसी सप्लाय) करण्यासाठी केला जातो. AC ते DC मध्ये रूपांतरण करण्यासाठी HWR सर्किटमध्ये सिंगल डायोड वापरला जातो.
हाफ वेव्ह रेक्टिफायर सर्किट एसी सप्लाई वेव्हफॉर्मचे एक-अर्ध चक्र पास करण्यास अनुमती देते आणि बाकीचे अर्धे चक्र अवरोधित करते.
HWR च्या सर्किटमध्ये खालील तीन मुख्य घटक असतात
१) एक डायोड
२) एक ट्रान्सफॉर्मर
३) लोड रेसिस्टन्स (भार )
हाफ वेव्ह रेक्टिफायर चे कार्य :
एसी उच्च व्होल्टेज ( Vp) स्टेप डाउन ट्रान्सफॉर्मरच्या प्रायमरी वायंडिंग ला दिले जाते आणि सेकंडरी वायंडिंग मध्ये उपलब्ध कमी व्होल्टेज (Vs) डायोड दिले जाते.
सेकंडरीच्या एसी व्होल्टेजच्या पॉझिटिव्ह हाफ सायकल चे वेळी वरील तो धन व खालील टोक ऋण होते. डायोड या पॉझिटिव्ह हाफ सायकल दरम्यान फॉरवर्ड बायस्ड असतो. त्याचा रोध शून्य होतो म्हणजेच तो क्लोज्ड स्वीच म्हणून काम करतो. आता डायोड व लोड रेसिस्टन्स या दोन्ही मधून विद्युत प्रवाह वाहतो. याची दिशा सेकंडरी चे वरील टोक (+) , डायोड , लोड, सेकंडरीचे खालील टोक अशी असते . या मुळे लोड RL मध्ये धन हाफ सायकल चे व्होटेज उपलब्ध होते.
सेकंडरीच्या एसी व्होल्टेजच्या ऋण हाफ सायकल चे वेळी वरील तो ऋण व खालील टोक धन होते. डायोड या निगेटिव्ह हाफ सायकल दरम्यान रिव्हर्स बायस्ड असतो. त्याचा रोध अनंत होतो म्हणजेच तो ओपन स्वीच म्हणून काम करतो. आता डायोड व लोड रेसिस्टन्स या दोन्ही मधून विद्युत प्रवाह वाहत नाही . या मुळे लोड RL मध्ये ऋण हाफ सायकल चे व्होटेज उपलब्ध होत नाही.
अशा रीतीने केवळ धन हाफ सायकल चे वेळी व एकाच दिशेने लोड मधून करंट वाहतो म्हणून याला डी सी करंट असे म्हणतात व या करंट मुळे लोड मध्ये उपलब्ध झालेले व्होल्टेज म्हंणजे डी सी व्होल्टेज होय.
हे डी सी व्होटेज खालील सूत्राने काढतात ..
Vdc = Vpeak / ᴨ
येथे , Vdc, Vav – डी सी आउटपुट व्होल्टेज
Vpeak – सेकंडरीचे जास्तीत जास्त व्होल्टेज
No comments:
Post a Comment