२५. रेक्टिफायर म्हणजे काय ? त्याचे प्रकार सांगा . कोणता रेक्टिफार प्राधान्याने वापरतात ? का ?
रेक्टिफायर हे एक इलेक्ट्रॉनिक सर्किट आहे जे एसी व्होल्टेजचे डीसी व्होल्टेजमध्ये रूपांतरित करते. दुस-या शब्दात, ते अल्टरनेटिंग(AC) प्रवाहाला डीसी प्रवाहात रूपांतरित करते. रेक्टिफायर जवळजवळ सर्व इलेक्ट्रॉनिक उपकरणांमध्ये वापरले जाते. मुख्यतः ते वीज पुरवठा विभागात, एसी मेन्स व्होल्टेजचे डीसी व्होल्टेजमध्ये रूपांतरित करण्यासाठी वापरले जाते. डीसी व्होल्टेजवर जवळपास सर्व इलेक्ट्रॉनिक उपकरणे काम करतात. रेक्टिफायर्सचे मुख्य दोन श्रेणींमध्ये वर्गीकरण केले जाते:
१) हाफ वेव्ह रेक्टिफायर आणि
२) फुल वेव्ह रेक्टिफायर.
फुल वेव्ह रेक्टिफायरचे पुन्हा दोन प्रकार आहेत
अ) फुल वेव्ह सेंटर टॅपड रेक्टिफायर
बी) ब्रिज रेक्टिफायर
या पैकी ब्रिज रेक्टिफायर प्राधान्याने वापरतात . कारण याच्या आउटपुट मध्ये डी सी व्होल्टेज चे प्रमाण जास्त असते . तसेच सेंटर टॅप ट्रान्सफॉर्मर ची गरज लागत नाही.
No comments:
Post a Comment