१९. झिनर डायोड म्हणजे काय ? झिनर डायोड चे कार्यतत्व स्पष्ट करा. सांकेतिक चिन्ह काढा व उपयोग सांगा .
नेहमी रिव्हर्स बायसमध्ये जोडलेले, तीव्र प्रमाणात डोपिंग केलेले पीएन-जंक्शन सेमीकंडक्टर डायोडला झिनर डायोड म्हणतात.
कार्यतत्त्व: डायोड जेव्हा जास्त प्रमाणात डोप केले जाते, तेव्हा त्याचा डिप्लेशन लेयर अतिशय अरुंद होतो. जेव्हा आपण झीनरला दिलेले रिव्हर्स व्होल्टेज वाढवतो, तेव्हा डिप्लीशन लेयरमधील विद्युत क्षेत्र खूप तीव्र होते.एक विशिष्ट व्होल्टेजला हे तीव्र इलेकट्रोस्टॅटीक क्षेत्र सहसंयोजक बंधांमधून इलेक्ट्रॉन्सना खेचते. त्यामुळे मोठ्या प्रमाणात इलेक्ट्रॉन-होल जोड्या तयार होतात आणि जंक्शनमधून तीव्र विद्युत प्रवाह वाहतो,मात्र झिनरच्या दोन टोकातील व्होल्टेज स्थिर राहते. हा परिणाम म्हणजेच 'झिनर प्रभाव'. ज्या व्होल्टेजला हे घडते त्याला झिनर व्होल्टेज असे म्हणतात.झिनर प्रभावामुळेच झिनर डायोड चा उपयोग व्होल्टेज रेग्युलेटर म्हणून करतात.
झिनर डायोड नेहमी रिव्हर्स बायस मोडमध्ये व्होल्टेज स्थिर ठेवण्यासाठी वापरतात.
सांकेतिक चिन्ह :
उपयोग :
झिनर डायोडचा वापर:
1) झिनर डायोड मुख्यतः व्होल्टेज रेग्युलेटर म्हणून वापरला जातो.
२) झिनर डायोड डायोड क्लिपर सर्किट्समध्ये आहे
No comments:
Post a Comment